सेलु/अभय बेदमोहता
सेलु नगरपंचायतीने “स्वच्छ आणि सुंदर आमचे सेलु” या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दोनदा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला आहे, मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती या दाव्यांच्या अगदी विपरित आहे.सेलु हे तालुक्यातील एक महत्त्वाचे संपन्न जंक्शन मानले जाते, जिथे वर्धा आणि नागपूरकडे जाणारी वर्दळ नेहमीच मोठ्या प्रमाणावर असते.मागील दोन वर्षांत विकासाच्या नावाखाली या शहराची अवस्था अत्यंत भकास झाली असून, सिमेंटच्या रस्त्यांवर आता पायी चालणेही कठीण झाले आहे.यशवंत चौकातील वाढत्या समस्या आणि प्रशासनासाठी ठरलेला येथील अनास्थाफ्लायओव्हर पाडल्याने अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ़ झाली आहे.पूर्वी यशवंत चौकात प्रशस्त पूल (फ्लायओव्हर) होता. तो अपघात स्थळ ठरत असल्याच्या कारणावरून सौंदर्यीकरण व सपाटीकरणासाठी पाडण्यात आला, मात्र त्यानंतर नवीन पुल उभारण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. या चौकाच्या आसपास शाळा, महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि न्यायालय असल्याने हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे.खड्ड्यांचे साम्राज्याने हा चौक आता पूर्णपणे खड्ड्यात रूपांतरित झाला असून, तेथील रस्त्यावरील गिट्टी पुर्णपणे उघडी पडली आहे.त्यामुळे रस्यावरुन भरधाव धावणाऱ्या वाहनांचे अतोनात होत आहे.यखमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ऋतूमानानुसार पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांच्या वेगामुळे रस्त्यावरील दूषित पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते.तर उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून, यामुळे नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.पालकमंत्री आणि राजकीय नेत्यांची उदासीनता दिसून येत असलीतरीहे पालकमंत्र्यांचे निवडणूक क्षेत्र आहे . तरी सुद्धा या गंभीर समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असणे नागरिकांसाठी अत्यंत आश्चर्याचा विषय बनला आहे.विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी, येथील त्यांचे स्थानिक पदाधिकारी हवेत उडत असून मंत्र्यासारखे वागत असल्याचा रोष नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.पत्रकार आणि नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे डोळे औपठउघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी या चौकात एखादा मोठा बळी जाण्याची वाट पाहत आहात का, असा संतप्त सवाल सेलुतील त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासन आणि प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गावातील रस्त्यांची व यशवंत चौकाची दुरस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल.


