सेलू/अभय बेदमोहता
माहेर शांती निवास वृद्धाश्रम सेलू घोराड चे वतीने श्रावण महोत्सव 2026 उत्साहपुर्ण वातावणात आनंदात साजरा करण्यात आला यात सेलूतील शितला माता महिला भजन मंडळाचे महिलांनी गीतावर सादर केलेले नृत्य अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले यात सहभागी वयोवृध्द महिलांच गितांचे तालावर थिरकणारे पाय पाहता अनेकांचे चेहर्यावर आनंद दिसून येत होता सुरवातीला पार्बतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा हे गित सादर करण्यात आले त्यानंतर श्रावणावर आधारीत झिलमिल झिलमिल पाऊस झाला, झिरमिर करी मदनाचा वारा या गीतावर भजनी मंडळीसह महिलांनी नृत्य सादर केले माहेरच्या या श्रावण महोत्सवात पारंपारीक मराठी वेशभूषा धारण करीत सहभागी सुनंदा खोडे, कुसुम महाजन, मीरा येळणे, रत्ना घवघवे, छाया धोंगडे, माजी ग्रा.पं.सदस्य सुवर्णा धोंगडे, माया शेळके या महिलांनी राबविलेलेला हा उपक्रम जणू जुन्या आठवणींना उजाळा मिळेल असा होता हे नृत्य सादर केल्याबद्दल या महिलांचा बक्षीस देऊन संस्था अध्यक्ष सिस्टर लुसी कुरियन यांचे हस्ते सन्मान करण्यात आला
. या कार्यक्रमाला सिस्टर लुसी कुरियन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संचालिका व संस्थापिका माहेर संस्था , शितलताई पंकज भोयर प्रियदर्शनी महिला विकास संस्था अध्यक्ष, गीतांजली गारगोटे पोलिस उपनिरीक्षक वर्धा शहर,.योगिता संजय इंगळे, सुषमा संजय मानमोडे ,कविता अमर गुंदी उपसरपंच जुवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.


